क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाकडून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

0
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाकडून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

उस्मानाबाद/ प्रतिनिधी:-
  क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा उस्मानाबाद वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती सोमवार( दि.1 ऑगस्ट) रोजी अण्णाभाऊ साठे चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आली.

   यावेळी लसाकम जिल्हा अध्यक्ष अभिमान पेठे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी, एम टी सूर्यवंशी, सुरेश खंदारे, राघू कसबे, बाळासाहेब कसबे,माणिक साठे, विशाल शिंगाडे व इतर सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top