उस्मानाबाद : उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी म्हणून आज सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती डॉ. राजगोपाल देवरा , प्रधान सचिव ( सेवा ) यांनी केली आहे.
तर उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली प्रकल्प संचालक , बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामविकास प्रकल्प पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
डॉ. सचिन ओंबासे यांची उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदासाठी निवड करण्यात आली असल्याचे पत्र व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे येथे बद्द लीचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व जिल्ह्यातील नागरिकांतून दिवेगावकर यांची बदली बदली झाल्याने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नागरिक मत व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात विविध कामे केली तसेच शेत रस्ते अतिक्रमण मुक्त , खुले करण्यासाठी देखील मोठी चळवळ उभी केली आहे.


