google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगी साठीचे अर्ज दि.18 ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत करावेत.

 या परवानगीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, फॉर्म LE-5, ओळखपत्र तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषदेचे, नगर पंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आणि साक्षांकित नकाशा, संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकाचे नाहरकत आणि जागेचे कागदपत्र, संबंधित पोलिस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र आणि विहीत परवाना फीस भरणा केल्याचे चालन सादर करावे. परीपूर्ण असलेले प्रस्ताव या कार्यालयास स्वीकारले जातील. विहीत दिनांकानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top