google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहात पालक मेळावा संपन्न

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहात पालक मेळावा संपन्न

0


उस्मानाबाद,दि.03(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारा संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने), या शासकीय वसतीगृहात पालक मेळावा घेण्यात आला. या पालक मेळाव्याचे आयोजन दि. 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा निमित्त केले.

या पालक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी जी अरवत हे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे सिरसट बी. डी. हे उपस्थित होते त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या पालक मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना आणि पालकांना मार्गदर्शन करत असताना वसतीगृह योजनेचा लाभ घेत असताना विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करावे तसेच पालकांनीही विद्यार्थिनींच्या शाळा महाविद्यालय आणि शासकीय वस्तीग्रह प्रशासनासोबतही समन्वय ठेवावा. विद्यार्थिनींना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतीगृह अधीक्षक बी.ए. नाईकनवरे यांनी केले. या पालक मेळाव्यामध्ये सोमनाथ कटारे आणि संतोष ताकपिरे आणि उपस्थित पालकांनीही मनोगत व्यक्त केले तसेच वसतीगृह  प्रवेशित विद्यार्थिनी कुमारी अस्मिता माने यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कुमारी श्वेता ताकपेरे हिने सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top