google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंगोली आश्रम शाळेत विस्ताराधिकारी प्रकाश पारवे यांच्या हस्ते ई लर्निंग रूमचे उद्घाटन

शिंगोली आश्रम शाळेत विस्ताराधिकारी प्रकाश पारवे यांच्या हस्ते ई लर्निंग रूमचे उद्घाटन

0

शिंगोली आश्रम शाळेत विस्ताराधिकारी प्रकाश पारवे यांच्या हस्ते ई लर्निंग रूमचे उद्घाटन

उस्मानाबाद :- शिंगोली आश्रम शाळेत श्री प्रकाश पारवे साहेब विस्ताराधिकारी यांच्या हस्ते ई लर्निंगचे रूमचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक शिंदे. के. बी., पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांच्याकडून कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण साहेब व श्री प्रकाश पारवे साहेब विस्ताराधिकारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

 आश्रम शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत पुढे येण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी लागण्यासाठी व त्याचा शालेय अभ्यास, आधुनिक जगाची माहिती व तंत्रज्ञान, चालू घडामोडी माहीत होण्यासाठी योजना करण्यात आली आहे. सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यातर्फे 55 इंची बीपीएल कंपनीचा टीव्ही संच शाळेला भेट देण्यात आला आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण साहेब व प्रमुख पाहुणे श्री प्रकाश पारवे साहेब विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगून व महाभारतामधील अर्जुन व एकलव्याच्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील. आर . बी यांनी केले. कार्यक्रम साठी श्री जाधव चंद्रकांत, श्री बर्दापुरे सूर्यकांत, श्री राठोड शेषराव, श्री पडवळ .के. आर, श्री कैलास शनीमे, श्री सतीश कुंभार, श्री मदन कुमार अहमदापुरे, श्रीमती व्यवहारे, श्रीमती कांबळे, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती तोगरगे इत्यादी शिक्षक व कर्मचारी श्री रेवा चव्हाण, श्री वसंत भिसे, श्री गोविंद बनसोडे, श्री बबन चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top