परंडा येथे होणार महाआरोग्य शिबिर, सहा लाख लोक शिबिरात होणार सहभागी- आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्धाटन
परांडा (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात होणारे पहिले महाआरोग्य शिबिर हे परंडा येथे 27 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून सहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे, नुसती आरोग्य तपासणी नसून या शिबिरात सामील झाल्यानंतर किती ही गंभीर आजार असला तर त्याचा उपचाराचा पुढील खर्च देखील आरोग्य विभाग करणार आहे. या महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उद्घाटन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी दिली.
डॉक्टर तानाजी सावंत यांनी परांडा येथील कोटला मैदानाची आज पाहाणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ गलांडे, जिल्हा आरोग्य आधिकारी मिटकरी, उपविभागीय आधिकारी रोहिणी नरे, यांच्यासह आधिकारी यांची उपस्थिती होती.
एक हजार वाहने ही ग्रामीण भागातून तपासणीसाठी रूग्णांना आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. या रूग्णांची तपसणी करण्यासाठी देशातील तज्ञ डाॅक्टरांची टिम येत आहे. ही नुसती तपासणी नाही तर औषधोपचार तसेच गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.