विकास कामे वेळेत आणी दर्जेदार करा - पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
परांडा (प्रतिनिधी)
आपले सरकार आल्यावर आपण पाहिले असेल की आपल्या भागाची विकासकामे ही जोरात सुरू झाली आहेत, परंतु ही कामे दर्जेदार आणी ठरवून दिलेल्या वेळेतच करावीत अशा सुचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या ते परांडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्थानक पर्यंतच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
18 कोटी रूपये खर्च करून होणारया या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार असावे, नागरिकांची कायमस्वरूपी सोय होणारे हे काम असावे ,कामाचा दर्जा हा उच्च प्रतीचा असला पाहिजे आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ते ठरवून दिलेल्या वेळेतच झाले पाहिजे अशा सुचना नगर परिषदेच्या संबंधित आधिकारी तसेच इतर यंत्रणेला दिल्या, दर्जेदार कामासाठी लागणारया निधी हा पाहिजे तेवढा उपलब्ध करून देण्याची ग्वाही या प्रसंगी सावंत यांनी दिली.
परांडा शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा हा रस्ता अत्यंत खराब झाला होता, या भागातून दररोज जाणारे नागरिक यांनी हा रस्ता व्हावा अशी मागणी मंत्री सावंत यांच्याकडे केली होती, याच मागणीला विचारत घेत पालकमंत्र्यानी हा रस्ता मंजूर करत या करिता लागणारा 18 कोटी रूपयाचा निधी मंजूर करून नगर परिषद परांडा कडे वर्ग देखील केला.
दरम्यान आज या रस्त्याचे भूमिपूजन झाल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त करून परांडा शहराच्या इतर नागरी सुविधा देखील अशाच पध्दतीने पूर्ण करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करताच हे आपले सरकार आहे, आपल्यासाठीच काम करणारे सरकार आहे, त्यामुळे आपण आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला तो निश्चित आम्ही सार्थ ठरवू असे आश्वासन यावेळी सावंत यांनी दिले.
या भूमीपूजन सोहळ्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळूंके, उपविभागीय आधिकारी रोहिणी नरे, तहसिलदार देवणीकर, यांच्यासह पदाधिकारी, आधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.