डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी करण्यात आले विनम्र अभिवादन.
बातमी संकलन :- प्रकाश साखरे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव येथे प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी ग्रामसेविका शेख मॅडम, तलाठी ए बी काळे, उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, शिपाई श्याम काटवटे, संगणक चालक बाळू उंबरे, मुख्याध्यापक उमेश पोतदार सह शिक्षक प्रशांत गायकवाड,सहशिक्षक माशाळे, मुकेश साखरे आपास साखरे, कालिदास भोवाळ, शंकर भोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते