google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस अधिकारी- अंमलदार यांचा सत्कार

पोलीस अधिकारी- अंमलदार यांचा सत्कार

0

                     Osmananabad : मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे ‘पोलीस महासंचालक पदक’ ‍पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस अधिकारी- अंमलदारांना दिले जाते. उस्मानाबाद पोलीस दलातील पोउपनि- श्री. राजेंद्र ठाकुर, श्री.गुलजारखान पठाण, सपोफौ- श्री.रविंद्र कचरे, श्री. रमेश कवडे, श्री. हबीब पठाण, पोहेकॉ- श्री. सचिन कळसाईन या 6 व्यक्तींना पोलीस दलातील उत्कृष्ठ सेवेबद्दल ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर झाल्याने आज दि. 07.12.2022 रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहात मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते नमूद व्यक्तींना पदक व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- 2021 यामध्ये उस्मानाबाद पोलीस दलातील पोलीस अंमलदार- हरीदास मैंदाड, एकनाथ नागरगोजे, विशाल बनसोडे, स्वप्नील नरवडे, किरण हावळे यांची निवड झाल्याने मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांना गौरविले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. नवनीत काँवत यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top