एनडीआरएफ तर्फे जिल्हा पोलीसांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

0



Osmananabad : -

            पुणे येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (National Disaster Response Force) च्यावतीने उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील जवानांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज दि. 03.12.2022 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर पोलीस मुख्यालय व हातलाई तलाव येथे आयोजित करण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका, भुकंप, महापूराच्या प्रसंगी बचाव कार्य कसे करायचे, पाण्याच्या तळावरील संशयास्पद वस्तूंचा शोध कसा घ्यावा, रुग्णाची हाताळणी- वाहतूक इत्यादी विषयी यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांसह पोलीस निरीक्षक- विजयंत जयस्वाल, अरविंद दुबे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्रीमती- वृषाली तेलोरे यांसह पोलीस अंमलदार हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top