उस्मानाबाद : शहरातील शम्स चौक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण करण्यासाठी नगरसेवक बाबा मुजावर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण करून चौकाचे सौंदर्य वाढविले आहे.
शम्स चौक आकर्षित विद्युत रोषणाई व सुशोभीकरण याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय ( मामा ) निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक बाबा मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण , ईस्माईल शेख, सय्यद खलील सर, बिलाल तांबोळी , अजहर सय्यद, असलम सय्यद, सामाजिक कार्यकर्ता अजहर मुजावर , शम्श चौक ग्रुपचे अध्यक्ष बबलू बागवान, उपाध्यक्ष सलमान मुल्ला व खाजा नगर आणि शम्स चौक येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.