उस्मानाबाद पोलिसांचा गावठी दारु निर्मीती अड्ड्यांवर छापे
Osmanabad : पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जून- 2022 पासून उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे यात अवैध मद्य निर्मीती-विक्री यांवर आळा बसवून विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा उलगडा केला. यातूनच तुळजापूर तालुक्यातील पाटील तांडा येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु निर्मीती होत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथकाने आज दि. 02.12.2022 रोजी पहाटेच्या सुमारास पाटील तांडा येथे छापा टाकला असता तेथे पाटील तांडा ग्रामस्थ- 1)विलास बाबु पवार, वय 38 वर्षे 2)चावळाबाई धनू पवार, वय 60 वर्षे 3)लखन हिरा चव्हाण, वय 25 वर्षे हे तांड्यावर आपापल्या घराजवळ गावठी दारु निर्मीती करत असताना पथकास आढळले. यावेळी त्या तीन्ही ठिकाणावर लोखंडी व प्लास्टी अशा एकुण 46 पिंपांत गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 9,200 लि. द्रवपदार्थ व एकुण 14 कॅनमध्ये सुमारे 535 लि. गावठी दारु असा एकुण अंदाजे 5,02,800 ₹ किंमतीचा मद्यसाठा आढळला. यावर पथकाने मिळुन आलेल्या नमूद गावठी दारु निर्मीतीच्या द्रव पदार्थातील काही द्रव व गावठी दारुमधील काही दारु काढून घेउन ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याकरीता जप्त केली. तर उर्वरीत गावठी दारु निर्मीतीचा अंबवलेला द्रव पदार्थ व गावठी दारु ही नाशवंत असल्याने तो मद्यसाठा पोलीसांनी पंचांसमक्ष जागीच ओतून नाश करुन मद्यनिर्मीतीचे व गावठी दारुचे साहित्य जप्त केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) (फ) अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 405, 406, 407/ 2022 हे 3 गुन्हे नोंदवले आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. शैलेश पवार, पोउपनि श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- उलीउल्ला काझी, शौकत पठाण, विनोद जानराव, जावेद काझी, अमोल निंबाळकर, इरफान पठाण, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, नितीन जाधवर, अमोल चव्हाण, बबन जाधवर, वैशाली सोनवणे, रविंद्र आरसेवाड, आशमोड, कोळी, रंजना होळकर, विजय घुगे, मस्के, महेबुब अरब यांसह पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथक, जलद प्रतिसाद पथक यांतील पुरुष व महिला पोलीस अंमलदारा यांच्या पथकाने केली आहे.