उस्मानाबाद : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग कळंब हददीत महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा विक्री करणारे इसमाची माहिती घेवुन आज दिनांक 10/01/2023 रोजी 12.30 वाजता एसडीपीओ कळंब च्या पथक पोउपनि जी. पी. पुजरवाड, मपोउपनि श्रीमती सांबळे, पोना 1534 शेख, पोकॉ 1812 अंभोरे, पोकों 1782 अंभोरे, पोकों 1875 मंदे, चापोना 1215 चव्हाण असे पोलीस स्टाफ कळंब सह रवाना होवुन 03 ठिकाणी छापे 1) मारुन मदिना चौक कळंब येथील शुभम किराण मालक श्रीनिवास सत्यंनाराण करवा वय 50 वर्षे रा. जुने सोनार गल्ली कळंब यांच्याकडे 19090/- रुचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याचे मुद्देमाल मिळुन आला आहे. 2) सावित्रीबाई फुले शाळेच्या पाठीमागे शुभम श्रीनिवास करवा वय 25 वर्षे रा. जुने सोनार गल्ली , कळंब याचे सावित्रीबाई फुले शाळेच्या पाठीमागं घरामध्ये 187020/- रुचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याचे मुद्देमाल मिळून आला आहे 3) सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजुला असलेला गोडाऊन कळंब मनोज झुबारलाल मालपाणी वय 50 वर्षे रा खाटीक गल्ली कळंब याच्या गोडाऊन मधुन 149170/- रुचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याचे मुद्देमाल मिळुन आला आहे व गुटखा विक्री करणारा रुपेश विष्णुदास मालपाणी वय 36 वर्षे रा. खाटीक गल्ली कळंब असे एकुण 04 आरोपी कडुन 355280/- रु महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याचे व साहित्यं मुद्देमाल मिळुन आला आहे. वरील चारही आरोपी यांच्या विरुध्दं सरकार तर्फे फिर्यादी होवुन पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ची माहिती सह पोलीस अधीक्षक उपविभागीय कळंब रमेश यांनी दिली आहे.
कळंब शहारा प्रमाणे उस्मानाबाद शहरात देखील खुलेआम गुटखा विक्री होताना दिसत आहे. कळम प्रमाणित गुटखा विक्री करणाऱ्या मुख्य गुटखा विक्रेत्यावर कारवाई व्हावी अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे मात्र कारवाई होताना दिसत नाही.