पोलीस असल्याचे बतावणी करुन एक तोळ्याचे दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास

0
 पोलीस असल्याचे बतावणी करुन एक तोळ्याचे दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास 

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : राजपूत गल्ली, ढोकी येथील- दिलीप मोतीसिंग तिवारी, वय 75 वर्षे हे दि. 11.05.2023 रोजी 11.00 वा. सु. आळणी चौक ते रोडने पायी जात होते. दरम्यान आळणी शिवारातील मारुती मंदीराचे जवळ पाठीमागून युनिकॉर्न मोटरसायकल क्र आर जे. 1491 वरील अनोळखी दोन पुरुषाने दिलीप यांना आम्ही पोलीस असल्याचे बतावणी करुन दिलीप यांचे हातातील एक तोळ्याचे दोन सोन्याच्या अंगठ्या अंदाजे 1,20,000 ₹ किंमतीच्या काढुन खिशात ठेवण्यास सांगून त्या विश्वासाने मागून घेवून मोटरसायकलवर बसून निघून गेले. अशा मजकुराच्या दिलीप तिवारी यांनी दि. 11.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 170, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top