वृक्ष लागवडीसाठी “हर घर नर्सरी” अभियान प्रभावीपणे राबवा जिल्हाधिका-यांचे अधिका-यांना निर्देश
उस्मानाबाद,दि,22(प्रतिनिधी):- हर घर नर्सरी ही शासनाची महत्वकांक्षी योजना असून येत्या पावसाळ्यात जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी, यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,निवासी उपजिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी(रोहियो)
हर घर नर्सरी उपक्रमातून प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने, किमान ५० रोपे तयार करायची आहेत. या उपक्रमात शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनीही कृतीशील सहभाग नोंदवावा, प्रत्येक शासकीय कार्यालयात पाच हजार रोपांची रोपवाटिका तयार करावी, स्थानिक प्रजातींच्या रोपांची प्राधान्यानं निर्मिती करावी,नगरपरिषादांकडे उपलब्ध असलेली तसेच उपयोगात नसलेल्या जागांवरही रोपवाटिका तयार करावीअशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढावा हा “हर घर नर्सरी” उपक्रमाचा हेतू आहे.सर्व शाळा, शिक्षण संस्था,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशु वैद्यकीय दवाखाने तसेच प्रत्येक ग्राम पंचयत स्तरावर ही मोहीम राबविली जाणार. यामुळे वृक्ष लागवड अभियानाला व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकणार आहे. या उपक्रमामध्ये शासनाच्या सर्वच यंत्रणांचा सहभाग आवश्यक आहे.सर्व उपजिल्हाधिकारी,तहसीलदार , गट विकास अधिकारी , शिक्षण विभाग,आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.असेही श्री.गुप्ता म्हणाले.
शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाने किमान ५० रोपे तयार केल्यास २०२३ च्या पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपांची स्थानिक पातळीवर उपलब्धता होईल. यासाठी लोकजागृती आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी, शासकीय अधिकारी-कर्मचा-यांनी ‘हर घर नर्सरी’ उपक्रम प्रभावीपणे राबवून यशस्वी करण्याचे उपजिल्हाधिकारी(रोहियो)महेंद्