google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील बॅनर,पोस्टर,होर्डींगवर QR कोड बंधनकारक- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील बॅनर,पोस्टर,होर्डींगवर QR कोड बंधनकारक- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

0
उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील बॅनर,पोस्टर,होर्डींगवर QR कोड बंधनकारक
- जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

उस्मानाबाद,दि,22( प्रतिनिधी ):-  जिल्हयातील नागरी क्षेत्रातील  सर्व प्रकारच्या जाहिराती बाबतचे , बॅनर/पोस्टर/होर्डिंग/  तसेच लोकप्रतिमार्फत लावण्यात येणारे कट आउट  यासाठी नगरपरिषद/नगरंचायत स्तरावरून नाहरकत प्रमाणपत्र हे IWBP पोर्टलच्या माध्यमातूनच उपलब्ध करून देण्यात यावेत.  तसेच पोर्टल वरून उपलब्ध होणारे नाहरकत प्रमाणपत्र हे QR कोड सहित असावे. सदरचा QR कोड हा बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट वर छापणे बंधनकारक करावे. याबाबतीत काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची सर्व मुख्याधिकारी यांनी  दक्षता घ्यावी.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेशित केले आहे. यासाठी नगरपरिषदेचा/नगर पंचायतीचा अतिक्रमण विभाग कक्ष/मालमत्ता विभाग कक्ष इ. यांचेवर हि जबाबदारी सोपविण्यात यावी. परवानगी / नाहरकत दिलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट दिण्यात आलेल्या   मुदतीनंतर दुसऱ्याच दिवशी काढून घेतले जातील,  याबाबतची दक्षता  संबंधित विभागाने घ्यावी. 
शहरात QR कोड शिवाय लावणेत आलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट हे विनापरवाना असलेचे घोषित करून तात्काळ काढून घ्यावेत.तसेच परवानगी/नाहरकत न दिलेले बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट हे तात्काळ काढून द्यावेत व त्यावर ज्या नागरिकांचे फोटो/नाव असतील त्यांना आपले नगरपरिषदेने/नगर पंचायतीने निश्चित करून दिलेले दंड आकारून तात्काळ वसूल करावेत. संबंधितांनी दंडाचा भरणा मुदतीत न केल्यास सदर दंडाची रक्कम संबंधिताचे स्वतःचे राहते मालमत्तेच्या मालमत्ता  कर व इतर करामध्ये समाविष्ट करून वसूल करावी.   QR कोड शिवाय तसेच   अनधिकृत लावणेत येणारे  बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट याबाबत परवानगी देणेसाठीचे दर व दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे. त्यानुसार वसुली करण्यात यावी व त्याचे स्वतंत्र नोंदी ठेवण्यात याव्यात.







अ. क्र. नगरपरिषद / नगरपंचायतीचे नाव बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट दर (रु.) (प्रतिदिन प्रती चौ.फुट/चौ.मी.) (प्रतिदिन रक्कम टाकावी) अनधिकृत बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट साठी आकारला जाणारा दंड (रु.) (प्रतिदिन प्रति चौ. फुट/चौ.मी) (प्रतिदिन दंडाची रक्कम टाकावी)

1 धाराशिव 14 रु. चौ.मी. 28 रु.चौ.मी.
2 तुळजापूर 1 रु. स्के.. फुट प्रतिदिन 2 रु. स्के.. फुट प्रतिदिन
3 नळदुर्ग 5 रु. स्के.. फुट प्रतिदिन 10 रु. स्के‍. फुट प्रतिदिन
4 उमरगा 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
5 मुरूम 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
6 कळंब 2 SQF/ day 5 SQF/ day
7 भूम 2 रु. स्केस. फुट प्रतिदिन 3 रु. स्केस. फुट प्रतिदिन
8 परांडा 2 SQF/ day 5 SQF/ day
9 वाशी 1 SQF/DAY 3 SQF/DAY
10 लोहारा 1 SQF/DAY 3 SQF/DAY

यापुढे शहरात विनापरवाना व QR कोड शिवाय एकही बॅनर/पोस्टर/होर्डिंग/कट आउट लावले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी  सर्व मुख्याधिकारी यांनी करावी.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top