शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा; कचरा डेपो हलवा – महाविकास आघाडीचा पालकमंत्र्यांना इशारा
धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या १४० कोटींच्या मंजूर कामांना तात्काळ सुरुवात करावी, तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना निवेदन दिले.
२३ फेब्रुवारी २०२४ रोजी नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. नियमांनुसार तीन महिन्यात कामांना सुरुवात होणे अपेक्षित असताना, दीड वर्ष उलटूनही कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे हाल सुरूच आहेत.
30 एप्रिल रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी भेट देऊन "रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जातील व कचरा डेपो अन्यत्र हलवण्यात येईल" असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने, दिलेल्या आश्वासनाचा विसर मंत्री महोदयांना पडला असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो दुर्गंधी आणि धुरामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. श्वसनाचे विकार आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कचरा डेपो इतरत्र हलवून त्यावर प्रक्रिया करण्याची मागणी महाविकास आघाडीने पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली.
या शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, नगरसेवक खलील सय्यद, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शेखर घोडके, काँग्रेस शहर प्रमुख अग्निवेश शिंदे, शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, तुषार निंबाळकर, राणा बनसोडे, गणेश असलेकर, इस्माईल शेख, रोहित निंबाळकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. मनीषा पाटील, अशोक पेठे, श्यामल पाटील, सरोजिनी जाधव, धनंजय राऊत, पंकज पाटील, विधानसभा अध्यक्ष शौकत शेख, राकेश सूर्यवंशी, अभिराज कदम, गणेश साळुंके, निलेश शिंदे, नाना घाटगे, राज निकम, सतीश लोंढे, अविनाश शेरखाने, मुजीब काझी, सय्यद साबेर, प्रदीप साळुंके, मिलिंद पेठे, अबरार कुरेशी, अमित उंबरे, सुमित बागल, अभिजीत देशमुख, व्यंकटेश दिवाने, अक्षय जोगदंड, सुयोग शिंदे, बिलाल कुरेशी, रुपेश शेटे आणि रोहित कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा; कचरा डेपो हलवा – महाविकास आघाडीचा पालकमंत्र्यांना इशारा
जुलै १९, २०२५
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा