धाराशिव,दि.११ जुलै (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.मुस्लिम,बौद्ध,शिख,ख्रिश्
या उपक्रमांतर्गत उमेदवारांना तीन महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार असून,इच्छुक उमेदवारांनी दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आदिवासी निवासी आश्रम शाळा,मोहा ता.कळंब येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७८८७३१३४६५ किंवा ८०१०९९५४४५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
प्रशिक्षणासाठी काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे.मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल. शारीरिक पात्रतेबाबत पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ सें.मी.,छाती ७९ सें.मी. (फुगवून ८४ सें.मी.) तर महिलांसाठी उंची किमान १५५ सें.मी.असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी १२ वी उत्तीर्ण असणे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे, शारीरिकदृष्ट्या सक्षम व निरोगी असणे बंधनकारक आहे.यासोबतच शैक्षणिक प्रमाणपत्रे,उत्पन्न प्रमाणपत्र,रहिवासी दाखला, ओळखपत्राची सत्यप्रत इत्यादी कागदपत्रांची सादरीकरणासोबत प्रत जमा करणे आवश्यक राहील.
या प्रशिक्षणातून अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना पोलीस भरतीसाठी सशक्त तयार करण्यात येणार असून,त्यांच्यात आत्मविश्वास आणि संधी मिळवण्याची क्षमता वाढवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.शासनाच्या या उपक्रमामुळे अनेकांना दिशा व प्रेरणा मिळणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी कळविले आहे.