धाराशिव शहर पोलीस ठाणे :
फिर्यादी नागेश विकास मडके (वय 33 वर्षे, रा. मागडी चाळ, तुळजापूर नाका, बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. हॉटेल भाग्यश्री, वडगाव शिवार, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 23 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता ते हॉटेल भाग्यश्री, वडगाव रोड, धाराशिव येथे उपस्थित होते.
यावेळी एका पांढऱ्या-निळ्या रंगाच्या रेडीयम असलेल्या इर्टीगा गाडीमधून जेवणासाठी आलेल्या सहा जणांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने फिर्यादीस गाडी जवळ बोलावले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांना गाडीच्या काचेत अडकवून शिवीगाळ करत जबरदस्तीने फरफटत नेत त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदूक कपाळावर लावली आणि मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी नागेश मडके गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याची सोनसाखळीही जबरदस्तीने काढून घेतली.
या घटनेबाबत नागेश मडके यांनी दिनांक 26 जुलै 2025 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित सहा जणांविरुद्ध IPC कलम 109, 115(2), 119(1), 352, 351(2), 3(5) सह 3, 25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.