धाराशिव (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून त्यांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा संघटक काशिनाथ (बाबा) वाघमारे, जिल्हा सहसचिव सोमनाथ नागटिळक, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. लक्ष्मण खुणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य युनुस पटेल, माजी महिला जिल्हाध्यक्षा अॅड. झीनत प्रधान, अॅड. निलेश प्रधान, पांडुरंग सरवदे, उमेश भालेराव, रघुनाथ गायकवाड, युवक आघाडीचे पदाधिकारी मनीष कांबळे, मिलिंद खुणे, कळंब तालुका महासचिव मोहन वाघमारे, धाराशिव तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, युवक आघाडीचे जिल्हा प्रवक्ते हिमेश खुणे, सोमनाथ पेठे, मनोज चांदणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या विचारांना अंगीकारून सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.