google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

0

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

उस्मानाबाद,दि,22( प्रतिनिधी ):- उस्मानाबाद नगरपालिका/उस्मानाबाद शहराच्या ठिकाणी इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमधुन उपलब्ध करून देण्यात येतात.

        या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज केले आहेत. सन 2021-22 चे प्रलंबित अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्यासाठी मा. डॉ.श्री. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, म.रा.पुणे यांचे विशेष प्रयत्नातून उस्मानाबाद जिल्हयासाठी शासनाकडून रक्कम रू.9071000/- इतकी तरतूद सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदर प्राप्त तरतुदीमधून प्रलंबित अर्जापैकी 219 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे जाहिर आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत यांचे कडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top