google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयात फळ वाटप

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयात फळ वाटप

0

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयात फळ वाटप

उस्मानाबाद : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बाजार चौक येथे नृसिंह ग्रुपच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांना व नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे वर्गणी मुक्त जयंती नृसिंह ग्रुपच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. 

यावेळी नृसिंह ग्रुपचे अध्यक्ष हर्षद हाजगुडे , उपाध्यक्ष अस्मित सुरवसे , सचिव प्रणव तोळकरी, कोषाध्यक्ष समर्थ तोडकरी यांनी विशेष कार्य केले. यावेळी शिवम तोडकरी, सुमीत उकडे, सोनु भावे, आलोक तांदळे, गणेश तोडकरी, लक्ष्मण कांबळे, समर्थ शिंदे , अवि कांबळे , आकाश पुदाळे यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top