उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेअरमन , संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : जनता सहकारी बँक उस्मानाबाद येथील- 1.उस्मानाबाद जिल्हा सहाकारी बँकेचे तत्कालीन चेअरमन 2. संचालक मंडळ व 3. मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व मुख्यालय उस्मानाबाद यांनी दि. 28.09.2005 ते दि. 31.03.2008 रोजीचे 18.00 वा. चे दरम्यान वरील सर्वांनी संगणमत करुन नोयडा टोल ब्रिज कंपनी लि.ही कंपनी दिवाळखोरीत असताना व त्या कंपनीची पडताळणी न करता त्या कंपनीमध्ये एसीई गिल्टस ट्रेडींग प्रा.लि.मुंबई या ब्रोकर कंपनीच्या मार्फतीने जैन सहकारी बॅक लि.व दि.अेक्सस्टाईल को.ऑपरेटीव्ह बॅक ली.बेंगलोर येथील खात्यावरुन डिप डिस्काउंट बॉन्ड खरेदी करणे करीता एकुण 4400 डिप डिस्काउंट बॉन्ड प्रत्येकी 23,000/- रु प्रमाणे असे एकुण 10 कोटी 12 लाख रुपये रक्कमेची नियमबाहय पध्दतीने बॉन्ड खरेदी करुन व रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया यांचे नियमावलीचे उल्लंघन करुन जास्तीची रक्कम देवुन जास्तीची रक्कम देवुन 5 कोटी 46 लाख 12 हजर रक्कमेची उस्मानाबाद जनता सहकारी बॅकेतील सभासद व ठेवीदार यांच्या रक्कमेची अपहार करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या प्रविण विष्णुपंत धाबेकर यांनी दि. 19.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.