कुचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठधाममधील रुग्णांना फळे व थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
उस्मानाबाद दि. १० (प्रतिनिधी) - जय छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष काकाराजे कुचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कुष्ठधाम येथील रुग्ण व शहरातील गोरगरिबांना फळे व थंड पाणी बाटल्यांचे वाटप दि.१० मे रोजी करण्यात आले.
यावेळी जय छत्रपती ग्रुपचे राज्य सचिव गंगीभाई कांबळे, युवक शहराध्यक्ष अजिंक्य जाधव, युवक अध्यक्ष अभिजित साठे, धीरज चव्हाण, अजय दाडे, अंकुश पेठे, मोसीन तांबोळी, बालाजी कांबळे, यशवंत कांबळे, अभिजीत कसबे, महेश पेठे, अमित भोसले, दादा कांबळे, रणवीर चव्हाण आदी उपस्थित होते.