आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा ABHA आयडी तयार करून घेण्याचे आवाहन

0




आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी

आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा ABHA आयडी तयार करून घेण्याचे आवाहन


उस्मानाबाद-दि.17 ( प्रतिनिधी ): आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा ABHA आयडी तयार करून घेणे बाबत.

 राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण दिल्ली यांच्या विद्यमाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना देशभर कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी नोंदणी ABDM पोर्टलवर करून देशातील आरोग्यसेवा वितरणात परिवर्तन घडवून आणण्याकरिता या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपला स्वतःचा व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा आयडी तयार करायचे आहे.

 आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्व आरोग्य सेवा डिजिटल स्वरूपात पोहोचण्याकरिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आभार आयडी तयार करायचे आहे.

 प्रत्येक नागरिकांनी स्वतःचा 14 अंकी आरोग्य खाते क्रमांक आभा क्रमांक तयार करावा हा क्रमांक कायमस्वरूपी असल्यामुळे जतन करून ठेवावा. आयडी तयार करताना healthid.abdm.gov.in ही लिंक निवडावी व त्यावर तुमचा आधार क्रमांक किंवा वाहन परवाना क्रमांक याचा वापर करून त्यात येणाऱ्या सूचनाप्रमाणे आपला व आपल्या कुटुंबाचा आभा क्रमांक तयार करून घ्यावा. किंवा गुगल प्ले स्टोअर मधून abdm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आभा ॲप डाऊनलोड करावे व त्यामधून आपली नोंदणी करावी व आभार क्रमांक तयार करून घ्यावा.

 तरी सर्व नागरिकांनी वरील सूचनानुसार आपण आपले व आपल्या कुटुंबीयांचे आभार क्रमांक तयार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top