उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाह्यरुग्ण विभाग ( जिल्हा रुग्णालय) रामभरोसे
उस्मानाबाद : उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाह्यरुग्ण विभाग ( जिल्हा रुग्णालय) रामभरोसे प्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी नऊ वाजता उघडते मात्र डॉक्टर , कर्मचाऱ्यांचे मनमानी कारभार सुरू आहे. वेळ मिळेल त्या वेळी हजर राहणे अशी परिस्थिती रुग्णालयात निर्माण झाली आहे.
अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यास वरिष्ठ अधिकारी यांना फोन करा , तक्रार करा असे थेट म्हणनं कर्मचारी करत आहेत. रोज सकाळी आठ वाजता रुग्णालयात येऊन बसतात मात्र अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर न राहिल्याने जिल्हा भरातुन येणाऱ्या रुग्णांना
दोन दोन तास तात्काळात बसावे लागत आहे. अजुनही छोट्या छोट्या उपचारासाठी रूग्णांना खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. लांखो रुपये पगार घेणाऱे डॉक्टर नेहमी रुग्णालय गैरहजर राहतात सगळ्या डॉक्टरचे विषेश सहकारी फोन, वाटस्प वर उपचार सल्ला घेऊन करत आहेत. याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहेत. असा प्रश्न जिल्हाभरातील नागरिकांना उपस्थित होत आहे.