२६ जून राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस
सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जाणार
उस्मानाबाद-दि.20():- दि.26 जून राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे शासनाने ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हास्तर, तालुकास्तर, गावपातळीवर सामाजिक न्याय दिन दि. 26 जून रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करावयाचा आहे. जिल्हास्तरावर दि. 26 जून 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समता दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे शुभहस्ते होणार आहे. समता दिंडीमध्ये महाविद्यालयाचे, माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तसेच एन.सी.सी. एन.एस.एस., स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांचा समावेश राहणार आहे. समता दिंडीचा मार्ग मल्टीपर्पज हायस्कूल, जिल्हा परिषद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास अभिवादन करून यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद येथे समता दिंडीचा समारोप होणार आहे. सकाळी ठिक 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, उस्मानाबाद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पत्रकार, विभागामार्फत पुरस्कारप्राप्त पुरस्कर्ते, विद्यार्थी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून जिल्ह्यातून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या अनु.जाती, विजाभज, विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यास राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इयत्ता 10 वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनु जातीच्या मुला मुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती. व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच निबंध, वकृत्व् स्पर्धाचे आयोजन, अस्पृश्यता निर्मूलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या खेडेगावांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर सामाजिक न्याय दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व सात गटविकास अधिकारी यांना 25 हजार रूपयांचा धनादेश या कार्यालयाकडून देण्यात येणार असून सर्व गटविकास अधिकारी यांनी तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली व गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने तालुकास्तरावर समता दिंडीचे तसेच मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करावेत.
तालुका स्तरावर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून तालुक्यातून इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इयत्ता 10 वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनु. जातीच्या मुला, मुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. निबंध,वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, सामाजिक न्याय विभागाच्या पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ट, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावयाचे आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे माहितीचे फलक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद, महाविद्यालये येथे लावून कार्यक्रम यशस्वी रितीने आयोजित करावयाचा आहे. तसेच गटशिक्षण अधिकारी यांनी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत या कार्यालयाकडून सर्व संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत.
****