ऊसतोड कामगारांना ओळपत्र देण्यासाठी २० आणि २१ जून रोजी ग्रामपंयातीमध्ये विशेष मोहिम

0

ऊसतोड कामगारांना ओळपत्र देण्यासाठी २० आणि २१ जून रोजी ग्रामपंयातीमध्ये विशेष मोहिम

 

उस्मानाबाद,दि.17(प्रतिनिधी):-  शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दि. 20 आणि 21 जून 2023 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी विहीत नमुन्यातील अर्ज व स्वयंघोषणापत्र संबंधीत ग्रामसेवकाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top