अभाविप जिल्हा संयोजकपदी तेजसिंह कोळगे यांची निवड
उस्मानाबाद दि 22 (प्रतिनिधी) अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे धाराशिव शहर मंत्री तेजसिंह रामदास कोळगे यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धाराशिव जिल्हा संयोजकपदी निवड झाली आहे . देवगिरी प्रांताचा नुकताच अभ्यास वर्ग आसली ता.शिरपूर जिल्हा धुळे येथे दि. 15 ते 18 जुन 2023 या कालावधीत संपन्न झाला या अभ्यास वर्गात देवगिरी प्रांताचे अध्यक्ष प्रा.सचिन कंदले सर व प्रदेश मंत्री नागेश गलांडे यांनी उस्मानाबाद शहराचे शहर मंत्री तेजसिंह कोळगे यांची पुढील एक वर्षासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उस्मानाबाद जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे . या पुढच्या काळात धाराशिव जिल्ह्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांना प्रेरणा देऊन विद्यार्थी परिषदेचे काम वाढवणार असल्याचे तेजसिंह कोळगे यांनी म्हटले आहे .