google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उमरगा येथे खासदार जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारीचे जागेवर निवारण

उमरगा येथे खासदार जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारीचे जागेवर निवारण

0

उमरगा  येथे आज  दि. 22 जून 2023 रोजी नगरपरीषदेच्या अंतुबळी सभागृहात  येथे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली  जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या जनता दरबार मध्ये उमरगा तालुक्यातील नागरिकांन कडून महसूल विभाग, महावितरण, जिल्हा परीषद, वनविभाग, आरोग्य, शिक्षण विभाग, पंचायत समिती घरकुल, शौचालयपशुसंवर्धन, पीक कर्ज, पोलीस अनुषंगाने एकूण 135 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.प्राप्त तक्रारी पैकी सर्वाधिक तक्रारी महसूल प्रशासन संदर्भात प्राप्त झाल्या होत्या. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांस तक्रारीचे जागेवर निवारण खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. उमरगा तालुक्यातील नागरिकांन कडून खासदार साहेबांचे आभार व्यक्त करुन समाधान व्यक्त केले आणि भविष्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल तात्काळ घेवून नागरिकांचे समस्या निराकरण करण्याबाबत उपस्थित सर्व अधीकारी वर्गाना सूचना करण्यात आले.  

  त्यानंतर सोलापूर- उमरगा राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित चालू कामाचा आढावा घेऊन  राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण सोलापूर चे प्रकल्प संचालक व संबंधित कंत्राटदारांना नागरिकांच्या तक्रारी सबंधित तक्रारीचे निराकरण 8 दिवसाच्या आत करण्यास सांगितले.     

 आजच्या जनता दरबाराच्या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, केशव ऊर्फ बाबा पाटील, रणधीर पवार, बस्वराज वरणाळे, सुरेश वाल्हे, दिपक जवळगे, अत्तार पटेल,सुधाकर पाटील, संतोष कलशेट्टी, अजीत चौधरी, विजय (काका) जाधव,रेखाताई पवार आदीसह उपविभागीय अधीकारी गणेश पवार, तहसिलदार येरमे ,गटविकास अधीकारी मरोड इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top