धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये , शिक्षण घेण्याकरिता अर्ज करावेत : बी.जी.अरवत

0

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये , शिक्षण घेण्याकरिता अर्ज करावेत : बी.जी.अरवत

 

उस्मानाबाद,दि.17( प्रतिनिधी ):-  धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, उमरगा येथील डॉ.के.डी.शंडगे इंग्लिश स्कूल उमरगा आणि कळंब तालुक्यातील विद्यानिकेतन प्रायमरी अँड हायस्कूल येरमाळा (इंटरनॅशनल स्कूल) या तीन शाळेंची निवड झालेली आहे. या शाळांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

शाळेत या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गात प्रवेश घेण्याकरिता दि.30 जून 2023 हा अंतिम दिनांक असून प्रवेश घेण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे लेखी स्वरुपात अर्ज करण्यात यावेत.

विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज (या कार्यालयाकडे उपलब्ध आहे), जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न (एक लाखाच्या आत असावे) आदी कागदपत्रे जोडून या कार्यालयाकडे विहीत मुदतीमध्ये सादर करावेत.

या योजनेकरिता धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे  सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top