उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अभिमन्यू पवार यांचा वडार समाजाच्या वतीने सत्कार संपन्न
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
वडार समाजाची आर्थिक सामाजिक प्रगती होण्यासाठी शिवसेना - भाजपा (शिंदे - फडणविस) सरकारने वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पै. कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी प्रारूप स्वरूपात दिल्या बद्दल समस्त वडार समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार वडार समाजाच्या वतीने तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नितिन भाऊ वाघमारे नगरसेवक लातूर महानगर पालिका आणि पिराजी मामा मंजुळे अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना प्रदेश कार्याध्यक्ष आणि वडार समाज बांधवांच्या हस्ते सत्कार करून आभार मानण्यात आले.