भारत राष्ट्र समिती पक्षाचे मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

0

भारत राष्ट्र समिती पक्षाचे मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

तुळजापूर : तालुक्यात भारत राष्ट्र समितीची सदस्य नोंदणी सुरू आहे. तुळजापूर येथील सुनील चव्हाण हे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करत आहेत. सदस्य नोंदणी तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यासाठी मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात तुळजापूर येथे आले होते त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. आपकी बार किसान की सरकार या विद्रवाक्यखाली येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बदल करायचा आहे शेतकऱ्यांचे सरकार आणायचे आहे यासाठी सगळ्यांनी भारतीय राष्ट्र समिती पक्षांमध्ये सामील होऊन काम करावे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बळ देऊन महाराष्ट्रात सत्ता आणावी असे प्रतिपादन यावेळी मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात यांनी केले. 

यावेळी सुनील चव्हाण , अॅड उदय भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top