भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला गावागावात मोठा प्रतिसाद

0

भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला गावागावात मोठा प्रतिसाद 

तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा. सुधीर बिदूं मा. हिमानुशी तिवारी,मा.माणिक कदम, थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, राम तीर्थ सह आजी बाजुच्या परिसरात भारत राष्ट्र समिती सदस्यत्व नोंदणी मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची  भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण व , अरविंद घोडके, सुरज बचाटे ,असीम जागीरदार नळदृग शहर कमिटी युवक लीडर , त्यांच्या टीमने माहिती दिली व पक्षाची सदस्य नोंदणी केली.

 यावेळी सुरेश राठोड, सिद्राम पवार, गोविंद जाधव, देविदास पवार, सतीश राठोड, रामराव राठोड, तानाजी चव्हाण, हारी चव्हाण यांच्यासह  परिसरातील सुनील चव्हाण यांच्या टीमने सदस्य नोंदणी केली.यावेळी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे " मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली आपकी बार किसान की सरकार अशा घोषणा देण्यात आल्या पक्ष नोंदणीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top