खरीप २०२२ पीक विम्या बाबत उद्या कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांच्याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक - आ. राणाजगजितसिंह पाटील

0
खरीप २०२२ पीक विम्या बाबत उद्या कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांच्याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक - आ. राणाजगजितसिंह पाटील 

 उस्मानाबाद : जिल्ह्यात खरीप 2022 मधील पीक विमा वितरणा मध्ये झालेल्या अनियमितते बाबत उद्या दि 28 जुलै रोजी दु. 3.00 वा कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली असून शेतकऱ्यांना त्यांच्या काही सूचना असल्यास त्या पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

खरीप 2022 मध्ये सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. विमा कंपनीने नियमबाह्य पद्धतीने जवळपास 1.5 लाख नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारल्या आहेत. तर नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांच्या रकमेत देखील मोठी तफावत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वातील मुद्द्यांचा चुकीचा संदर्भ लावून 50 टक्के नुकसान भरपाई रकमेत कपात करण्यात आलेली आहे. अनेक वेळा पंचनाम्या च्या प्रतीची मागणी करूनही पंचनामे उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे या बाबत बैठक आयोजित करण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. सदरील बैठक उद्या आयोजित करण्यात आली असून या बैठकीत प्रामुख्याने या बाबींच्या अनुषंगाने चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय करून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

सदरील बैठकीस अप्पर मुख्य  सचिव (कृषि), कृषी आयुक्त, सह सचिव (कृषि), विभागीय कृषि सहसंचालक, अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top