उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी सहा ठिकाणी कारवाई

0



उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी सहा ठिकाणी कारवाई 

 

Osmnabadnews : आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)उज्वला राजेंद्र पवार, वय 40 वर्षे, रा.रमाई नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद या दि 26.07.2023 रोजी 14.20 वा. सु. बबन रमाई नगर उडान पुलाचे डावे बाजूस पत्रयाचे शेड समोर अंदाजे 4,280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 88 सिलबंद बाटल्या व 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)नवनाथ  अभिमान मंजुळे, वय 33 वर्षे, रा.शिंदेवाडी, ता. जि. उस्मानाबाद हे दि 26.07.2023 रोजी 13.30 वा. सु. सारोळा सकणेवाडी म्हसोबा चौकातील सचिन उमाप यांचे शेतात पत्रयाचे शेड समोर अंदाजे 5,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 44 सिलबंद बाटल्या व 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे 2) अंजली दत्तात्रय पवार, वय 40 वर्षे रा. येडशी ता.जि. उस्मानाबाद या याच दिवशी 16.35 वा. सु. जुने रेल्वे स्टेशन परिसरातील आपल्या पत्राचे शेड समोर येडशी येथे अंदाजे 650 ₹ किंमतीच्या 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे स्वतंत्र 2  गुन्हे नोंदवले आहेत.

बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)हरि राजेंद्र सावळकर, वय 36 वर्षे, रा.केशेगाव ता. जि. उस्मानाबाद हे दि 26.07.2023 रोजी 19.20 वा. सु. केशेगाव ते धारुर जाणारे रोडचे बाजूस पत्रयाचे शेड मध्ये अंदाजे 1,750 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)अर्जुन संजय पवार, वय 19 वर्षे, रा. उस्मानाबाद हे दि 26.07.2023 रोजी 17.05 वा. सु. उस्मानाबाद ते तुळजापूर जाणारे रोडवर बी एस एन एल ऑवर शेजारी अंदाजे 3,200 ₹ किंमतीच्या 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे 2) प्रशांत इंगळे, वय 40 वर्षे रा. झाडे गल्ली, उस्मानाबाद या हे याच दिवशी 21.15 वा. सु. भारत ऑकीजच्या बाजूला हॉटेल उडानच्या बाजूच्या बोळात उस्मानाबाद येथे अंदाजे 2,800 ₹ किंमतीच्या 40 लि. सिंदी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे स्वतंत्र 2  गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top