आदिवासी पारधी समाजातील बेरोजगार युवकांसाठी कसबे तडवळा येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0

आदिवासी पारधी समाजातील बेरोजगार युवकांसाठी कसबे तडवळा येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी आदिवासी प्रवर्गातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यामध्ये विविध उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी या उद्देशातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उस्मानाबाद यांच्या माध्यमातून कसबे तडवळा तालुका  उस्मानाबाद येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्यात आले.

या सहा दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पारधी समाजातील प्रशिक्षणार्थींना नवनवीन उद्योग व्यवसायांची माहिती, व्यवसाय संधी, उद्योगांची निवड, संभाषण कौशल्य, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध योजना, सेवा उद्योग,निर्मिती उद्योग इत्यादीची सखोल माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या  प्रशिक्षणार्थींची उद्योग  संचालनालयाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना या अंतर्गत कर्ज प्रकरणे दाखल करण्यात येणार आहेत.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.एम.डी सूर्यवंशी, ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.भगवान गाडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री. पांडुरंग मोरे, कसबे तडवळ्याच्या सरपंच सौ.स्वाती जमाले, कार्यक्रम आयोजक श्री एस.बी गव्हाणे,प्रशांत मते, माजी सरपंच विजयसिंह जमाले, पारधी समाजाचे नेते व ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला असे श्री.नाना पवार, श्री.रामचंद्र पवार सर, जय हिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर, तडवळा  बीटचे बीट अंमलदार श्री.गुंजकर, पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर पवार, माजी सरपंच शिवाजी काळे आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top