सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची , त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ मध्ये ऑनलाईन सादर करावी.
osmanabadnews : दि,05 ):- जुन- 2023 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयाद्वारे चालु असुन सर्व आस्थापनाकडुन 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2023 असुन विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक आस्थापनेने नोंदणी तपशील देखील नोंदवुन आवश्यक ती सर्व माहिती अद्यावत करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, श्री.सं.रा.गुरव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये( रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (1) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष व एकुण अशी सांख्यिकी माहीती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडुन यापुर्वीच युजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन आपली अचुक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ किंवा, ईमेल-आयडी, osmanabadrojgar@gmail.com, अथवा asstdiremp.osmanabad@ese.