शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्षाची स्थापन , तक्रार निवारणासाठी संपर्क करण्याचे आवाहन
Osmanabadnews ,दि,05 ):- महाराष्ट्र राज्यामध्ये शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशावेळी गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता, आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाशी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 24 तास संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक- 8446117500, 8446221750, 8446331750 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एकुण .भ्रमणध्वनी,1 टोल फ्री क्रमांक व 1 ई मेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असून त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.