न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

0



न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

 

       Osmanabadnews ,दि,05 ):- उस्मानाबाद जिल्हयाचे नाव बदलून धाराशिव करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे Public Interest Litigation No.93 of 2022 With Public Interest Litigation No. 173 of 2022 दाखल असून नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर निर्णय घेऊन शासनामार्फत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्यापुर्वी महसूल व इतर विभागाशी संबंधित कार्यालये जिल्हयाचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते यांचे विधिज्ञांनी मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्यावर मा. उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांनी व त्यांचे अंतर्गत संबंधीत कार्यालयांनी उस्मानाबाद हे नांव जिल्हा, उपविभाग व तालुक्यासाठी वापर करावा. धाराशीव हे नांव अंतिम आदेशापर्यंत वापर करण्यात येवू नये असे निर्देश दिलेले आहेत.

मा.न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर जिल्हा, उपविभाग व तालुका असा करण्यात येवू नये. तसेच जिल्हयातील जे विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख हे धाराशिव नावाचा वापर करत आहेत, त्यांनी धाराशिव नावाचा जिल्हा, उपविभाग व तालुक्यासाठी वापर करू नये. मा.न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी.असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top