उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उत्कृष्ट कार्य, महसुल उद्दिष्ट प्राप्तीसह विविध योजनांची अंमलबजावणी , रस्ता सुरक्षा,ऑनलाईन सेवा सुविधेला प्राधान्य - गजानन नेरपगार यांची माहिती , rto Gajanan Nerapgar

0




उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उत्कृष्ट कार्य,  महसुल उद्दिष्ट प्राप्तीसह विविध योजनांची अंमलबजावणी , रस्ता सुरक्षा,ऑनलाईन सेवा सुविधेला प्राधान्य - गजानन नेरपगार यांची माहिती , rto Gajanan Nerapgar

 Osmanabad news ,दि,07(प्रतिनिधी ):- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उत्कृष्ट कार्य करीत महसुल उदिष्ट प्राप्तीसह विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. अपघातमुक्त प्रवास, रस्ता सुरक्षा,ऑनलाईन सेवा सुविधेला प्राधान्य दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली.

सहायक उपप्रादेशिक अधिकारी राहुल जाधव, मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र रूपदास,प्रसाद पवार,प्रशांत भांगे, प्रियदर्शनी उपासे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अजिंक्य डुबल,कुणाल होले,कुलदीप पवार,अजित पवार,कार्यालयीन कर्मचारी डी के लोंढे,नरसिंग कुलकर्णी,आर जी कुलकर्णी, आर जी नाईकवडे व सहकारी यांनी विविध उपक्रम राबवित जबाबदारी पार पाडली.

सन 2022-23 या आर्थिक वर्षात उद्दिष्टांकाची पुर्तता :

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद कार्यालयासाठी महसूल वसुलीचे रु. 76 कोटी  90 लाख इतके उद्दिष्ट दिलेले असून सदर उद्दिष्टांकापौकी रु. 79 कोटी 53 लाख उद्दिष्टांकाची पुर्तता करण्यात आली असून एकूण 103.42% इतकी महसूल वसुली सन 2022-23 या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.

 वायुवेग पथकामार्फत केलेल्या कामगीरी व उद्दिष्ट पुर्तता :

कार्यालयातील वायुवेग पथकासाठी सन 2022-23 या अर्थिक वर्षामध्ये रु. 2 कोटी 25 लाख उद्दिष्ट देण्यात आले होते त्या उद्दिष्टापौकी रु. 2 कोटी 31 लाख उद्दिष्टांकाची पुर्तता करण्यात आली असून एकूण 102.66% इतकी वसुली वायुवेग पथकामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात करण्यात आली आहे.या मध्ये भार क्षमतेपेक्षा जास्त मालाची वहातूक करणाज्या (Over load) वाहनाची तपासणी करण्यात येवून 390 दोषी वाहनांकडून रु. 1 कोटी 20 लाख इतका दंड वसूल केलेला आहे,

अवौध प्रवासी वाहतूक करणाज्या 289 वाहनांकडून रु. 5 लाख 60 हजार इतका दंड वसूल केला आहे. ऑटोरिक्षा तपासणी, वायुप्रदुषण, ध्वनी प्रदुषण, परावर्तिका न बसवलेली वाहने, योग्यता प्रमाणपत्र, परवाना नसलेली वाहने, विना हेलमेट, विना सिटबेल्ट, ट्रिपलसिट, अतिवेगाने वाहन चालविणे तसेच मोटार वाहन कायाद्याचे उलंघन करुन चालणाज्या इतर सर्व वाहनांकडून रु. 1 कोटी 4 लाख असा एकूण रु. 2 कोटी 31 लाख दंड व रु. 1 कोटी 20 लाख कराची वसूली वायुवेग पथका मार्फत करण्यात आलेली आहे.

नविन नोंदणी मार्फत प्राप्त झालेला महसूल :

आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत नविन नोंदणी वाहनधारकांकडून रु. 10 कोटी 43 लाख इतका महसूल या कार्यालयास प्राप्त झाला. आकर्षक पसंती क्रमांका द्वारे जमा झालेला महसूल :आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत वाहनास आकर्षक पसंती क्रमांक जारी केले त्या आकर्षक पसंती क्रमांकाद्वारे या कार्यालयास रु. 1 कोटी 50 लाख इतका महसूल प्राप्त  झाला आहे.रस्ता सुरक्षा विषयक कामगीरी : अपघातात होणारे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार या कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीमा, वाहन चालक मालक यांचे प्रबोधान व जनजागृती करण्यात आली तसेच मोटार वाहन कायद्याचे उलंघन करणाज्यां वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली त्याचे फलीत म्हणून जानेवारी ते मे 2022 मध्ये 314 अपघातांमध्ये 157 मृत्यु पावले होते तर जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीत 289 अपघातांमध्ये 127 मृत पावले याची तुलना केली असता जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीत 7.96% अपघातात घट झाली, तसेच मृत्युच्या संख्येमध्ये 19.10% इतकी घट झाली आहे.

 

 

पक्की अनुज्ञप्ती काढताना रस्ते सुरक्षे संबंधी दाखवण्यात येणारी चित्रफित :

नविन वाहनचालकांना वाहन चालवण्याची माहिती होण्या करिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद व CSR Box या संस्थे मार्फत रस्ता सुरक्षेचे व्हिडीओ दाखवून त्यावेळेस त्यांचे मार्गदर्शन केले जाते. एप्रिल 2022 ते मे 2023 या दरम्यान एकूण 11236 व्यक्तींना सदर प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यातून सुरक्षित रस्ते, सुरक्षित वाहने आणि सुरक्षित चालक घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2023 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद कार्यालयातर्फे शहरात व जिल्हयामध्ये दिनांक 11 जानेवारी 2023 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत अभियान राबविण्यात आले. सदर अभियाना दरम्यान शहरात धावणाज्या अॅटोरिक्षा/टॅक्सी  वाहनांवरती रस्ता सुरक्षा विषयक ब्ॉनर अथवा स्टीकर्स लावण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवून अवौध प्रवासी वाहतूक, ओव्हर स्पीड, ब्ल्ॉक फिल्म लावलेले वाहने, विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर, ओव्हरलोड प्ॉसेंजरची तपासणी करण्यात आली. तसेच संबंधीत वाहनचालकाचे उस्मानाबाद जिल्हयातील चौका चौकात सभा घेवून मार्गदर्शन करण्यात आले.उप प्रादेशिक कार्यालय, उस्मानाबाद कार्यालयाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उस्मानाबाद शहर व तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्यांचे रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात येवून त्यामध्ये शालेय विद्याथ्र्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व, हेलमेटचा वापर, वाहतूक चिन्हांची ओळख, दुचाकी स्वारामध्ये वेगमर्यादा बाबत ज्ञानाचा अभाव इत्यादी करणांमुळे अपघातामध्ये भर पडत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्याथ्र्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद व प्रजाप्रती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 मे 2023 ते 21 मे 2023 हा सप्ताह जागतीक रस्ता सुरक्षा सप्तह म्हणून पाळला गेला. या कालावधी मध्ये शहरात विविध ठिकाणी माहितीपत्रके व दिशादर्शक चिन्ह असलेली पत्रके वाटप करुन जनतेमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात आली.

        दिनांक 19 मे 2023 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व प्रजाप्रती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयात विविध कामासाठी येणा जनतेसाठी तसेच वाहन प्रशिक्षण चालक मालक यांना रस्ता सुरक्षाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये व्यसनमुक्ती, तनावमुक्ती, मेडीटेशन चे महत्व तसेच वाहतूक चिन्हाचे पालन केले पाहिजे, हेलमेट, सिटबेल्टचा वापर करणे, वाहन चालवताना मोबाईचा वापर न करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.उस्मानाबाद जिल्हयात एकूण 11 साखर कारखाने स्थित असून त्याकरिता विविध वाहनातून ऊस वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करणाज्या वाहनांमुळे (जसे की, रिफ्लेेक्टीव्ह टेप नसणे, जुने वाहन इ.) होणारे अपघात रोखण्याकरिता कार्यालयामार्फत मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली बौठक आयोजीत करण्यात येवून त्याद्वारे सर्व कारखान्यांना ऊस वाहतूकीबाबत मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वायुवेग पथक / महसूल सुरक्षा पथकातील मोटार वाहन निरीक्षक यांनी सर्व कारखान्यांना प्रत्येक्ष भेट देवून वाहन चालकांमध्ये जनजागृती केली. या कार्यालयामार्फत देण्यात येणाज्या फेसलेस सेवा : विभागामार्फत एकूण 115 सेवा ऑनलाईन स्वरुपात देण्यात येणार असून सद्य:स्थीतीत 84 सेवा ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. तसेच कार्यालयामार्फत एकूण 26 सेवा फेसलेस स्वरुपात देण्यात येत असून त्यासाठी parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करुन कागदपत्रे अपलोड व शुल्क भरणा केल्यास अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. या सेवांकरिता अर्जदारास कुठूनही अर्ज करता येणार आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  गजानन नेरपगार कळविले आहे.                                                                                                

****


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top