कळंब (प्रतिनिधी) दिनांक ५ ऑगस्ट रोजी कळंब शहरात १११११ वृक्षारोपणाचा ऐतिहासिक उपक्रम कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष असून यामुळे कळंब शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.याच कामासाठी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष व सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने ५१ हजार रुपयाची देणगी देण्यात आली. आज कळंब शहरात वृक्षारोपणाची जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते याचा समारोप विद्याभवन हायस्कूल या ठिकाणी झाला. यावेळी ही देणगी देण्यात आली. या देणगीची रक्कम कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष सहाय्यक पोलिस अधिक्षक एम.रमेश यांच्याकडे धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने प्रा.सतिश मातने यांनी सुपूर्द केली.
यावेळी कळंब वृक्ष संवर्धन समितीचे उपाध्यक्ष पोलीस निरीक्षक सुरेश साबळे,सचिव आनंद बलाई,संवर्धन समितीचे सदस्य विलास पाटील,संजय देवडा,विद्याभवनचे मुख्याध्यापक पवार,सुशील तीर्थकर,गणेश सदाफूले,प्राचार्य जगदिश गवळी,परमेश्वर पालकर,मंगेश यादव महादेव महाराज आडसूळ,रवि कोल्हे यांची उपस्थिती होती.
गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीचे काम सुरू असून त्याचे मूर्त स्वरूप ५ ऑगस्ट रोजी येणार आहे. या दृष्टिकोनातून कळंब शहरात व तालुक्यात जोरदार तयारी असून अनेक स्वयंसेवी संस्था,व्यक्ती व संघटना एकत्र येत असून यासाठी अनेक देणगीदार देखील देणगी देऊन सहकार्य करत आहेत. यामध्येच आज डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.