शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व बसेसने वेळेवर व सर्व थांबे घ्यावेत

0


शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व बसेसने वेळेवर व सर्व थांबे घ्यावेत

 

उस्मानाबाद,दि.3(जिमाका): उमरगा आणि तुळजापूर आगार प्रमुखांनी आपल्या आगारातील सर्व शालेय फेऱ्या वेळेवर व नियमित धावतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी दिले आहेत.  

उमरगा आगाराकडून उमरगा-सोलापूर या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उमरगा-सोलापूर या फेरीवरील मार्ग फलक हा साध्या बससेवेसाठी असणारा लावण्यात यावा. जलद सेवांचा लाल रंगातील मार्गफलक न लावण्याबाबतच्या सक्त सूचना सर्व चालक वाहकांना देण्यात याव्यात. तसेच आवश्यकतेनुसार उमरगा-सोलापूर मार्गावरील सर्व जलद सेवा सोलापूरपर्यंत सर्व थांबे घेवून चालविण्यात याव्यात. विशेषत: नळदुर्ग ते सोलापूर या अंतरावरील सर्व थांबे घेण्यात यावेत. तसेच दिलेल्या फेऱ्या वेळेवर व नियमित सुटतील याची दक्षता घेण्यात यावी.

तुळजापूर आगाराकडून नळदुर्ग व अणदूर या भागातील शालेय फेऱ्या नियमित व वेळेवर जातील, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top