सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन
Tuljapur : - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आज (दि.6) श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन यथासांग पूजाअर्चा केली. त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.
मधुर भांडारकर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते आहे. सन 2016 मध्ये भांडारकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फिल्मफेअर आवार्ड, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चांदणी बार, पेज थ्री, सत्ता, फॅशन, हिरोईन अशा अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले आहेत.
तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर भांडारकर यांचा धाराशीव जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत अंतीम महेश्वरी, अशोक पंडीत, मंदिर संस्थानचे अधिकारी सातपुते, अतुल मलबा, चैतन्य मलबा, विकास मलबा व इतर पुजारी, मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.