संभाजीनगर ( औरंगाबाद ) शहर प्रथमच अनुभवणार गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार
हसूल येथील हरसिद्धी देवीच्या यात्रेला आजपासून (२७ नोव्हेंबर) प्रारंभ होत असून, चारदिवसीय यात्रेत पहिल्याच दिवशी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हसूल येथील न्यू हायस्कूलच्या बाजूला हा कार्यक्रम होणार आहे.
पहाटे देवीची पालखी हरसिद्धी देवीच्या मंदिरात पोहोचणार आहे. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करण्यात येईल व यात्रेला सुरुवात होईल. यात्रेत कुस्तीची दंगल, घोड्याचे नाचकाम, हेल्याची सगर, घोड्याची रेस, दुचाकीची रेस ही यंदाची मनोरंजनाचे वैशिष्ट्ये आहेत. मंगळवारी (दि. २८) कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले असून, मंदिराजवळील कुस्ती मैदानात सकाळी १० पासून कुस्तीला सुरुवात होईल.
बुधवारी (दि. २९) सकाळी १० वाजता घोड्यांची नृत्य स्पर्धा सकाळी १० वाजता सुरू होईल. याच वेळी पशुप्रदर्शन व हेल्यांचे सगर असणार आहे. शिवाजी मैदानावर सायंकाळी ६ वाजता ऑर्केस्ट्रा होणार आहे. चौथ्या दिवशी गुरुवारी सकाळी १० वाजता घोड्यांची रेस व दुचाकीची रेस घेण्यात येणार आहे. जळगाव रोड, हर्सल सावंगी तलावाजवळ ही स्पर्धा होईल.