उस्मानाबाद-धाराशिव जिल्ह्यातील तीन जुगार विरोधी कारवाई , उस्मानाबाद-धाराशिव शहर पोलिस ठाणे हद्दीत मटका खुलेआम!
उस्मानाबाद-धाराशिव ( प्रतिनिधी ) उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत आनेक ठिकाणी अतिक्रमण केरुन खुलेआम मटका घेतला जात आहे . शहरातील एम एस ई बी ऑफिस समोरील परिसर , भारत टॉकीज परिसर, अडतलाइन परिसर , नागनाथ रोड परिसर, वैद्यकीय महाविद्यालय समोरील परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, या सह शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुलेआम विविध नावाचा मटका जुगार सुरू आहे. शहरात पोलीसांनी २७ नोव्हेंबर रोजी दोन ठिकाणी कारवाई केली आहे व ज्या ठिकाणी कारवाई केली त्या ठिकाणी पुन्हा खुलेआम मटका जुगार सुरू आहे. अशी शहरभर चर्चा रंगली आहे. उस्मानाबाद धाराशिव शहरसह कळंब शहरात देखील पोलीसांनी कारवाई केली आहे.
अधिक माहिती खालील प्रमाणे..
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 14.10 वा. सु. कळंब पो. ठा.आठवडी बाजार कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पाशा दगडू शेख, वय 35 वर्षे, रा. चोंदे गल्ली कळंब ता.कळंब जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. आठवडी बाजार कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.11.2023 रोजी 19.30 ते 19.35 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)इरशाद इलाही तांबोळी, वय 40 वर्षे, रा झोरी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवह सांजा रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 370 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)मैनु मदार तांबोळी, वय 40 वर्षे, रा खिरणी मळा, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.35 वा. सु. आरबीकलेक्शन समोर रोड लगत धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.