पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

0


पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

 

 धाराशिव,दि.30( ): जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज 30 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. या बैठकीमध्ये  विविध विषयावर चर्चा करण्यात आली. संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केस करणे, सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्राची त्रैमासिक तपासणी  करणे,  विविध बैठक आयोजन करणे,  सोनोग्राफी केंद्राचे नूतनीकरण अशा इतर  विषयावर चर्चा करण्यात आली. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सतत सतर्क असते. दर दोन महिन्याला पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते.

यावेळी बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, पीसीपीएनडीटी  नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुणे, आयएमए अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख,  जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड.शरद जाधवर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. शैलजा मिटकरी,  डॉ.संजय नलावडे, तेजस्विनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नंदा पुनगुडे, लोक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, पीसीपिएनडीटी  लिगल  ॲडव्हायझर ॲड. रेणुका शेटे आदी  जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित होते.

जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून अवैधरित्या गर्भलिंग निदान अथवा गर्भपात होत असल्यास जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी सेल अथवा  तालुकास्तरावर त्या कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून माहिती द्यावी अथवा टोल फ्री क्रमांक 18002334475 या क्रमांकावर गोपनीय माहिती देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व दिलेली माहिती खरी असल्यास गुन्हा दाखल झाला असता माहिती देणाऱ्यास  राज्यस्तरावरून खबरी योजना अंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top