तीन डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन , दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन

0

तीन डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन , दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन

 

धाराशिव,दि.30 ): दिव्यांग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना खेळामध्ये संधी मिळावी त्यांच्यातील सुप्त क्रीडा विषयक कौशल्यांना संधी मिळावी व त्या योगे दिव्यांग व्यक्तीमधील न्युनगंड दूर होवून त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन विकसीत व्हावा या उद्देशाने  तसेच दिव्यांग व्यक्तीसुध्दा समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून पुढे यावा यासाठी शासकीय, अनुदानित, विना अनुदानित व कायम स्वरुपी विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशालांमध्ये  दरवर्षी 3 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.     

            जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय अपंग मुला- मुलींच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.  जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन दि. 20 आणि 21 डिसेंबर या दोन दिवसाच्या  कालावधीमध्ये धाराशिव येथील श्री. तुळजाभवानी क्रीडासंकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रवर्गनिहाय मुकबधिर 375 , अस्थिव्यंग 250 मतिमंद 360, अंध 25 असे एकूण 1010 स्पर्धक सहभागी झाले आहेत या स्पर्धा 2 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रवर्गनिहाय व वयोगट निहाय मुला-मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये 25 मीटर भरभर चालणे, 50 मी धावणे, 100 मी धावणे, 200 मी धावणे, 400 मी धावणे, व्हील चेअर रेस, व्हील चेअरवर बसुन सॉफटबॉल थ्रो, व्हील चेअरवर बसुन गोळा फेक, लांब उडी, स्पॉट जंप, बादलीत बॉल टाकणे, बुध्दीबळ, गोळाफेक, चित्रकला, रांगोळी इ. क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पदक मिळविणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेस गुणांकनानुसार सर्व साधारण विजेतेपद देवून गौरविण्यात येत आहे. धाराशिव जिल्हयातील सर्व नागरिकांनी दिव्यांग विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थीत रहावे असे अवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.एम. गिरी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top