विविध शासकीय विभागांच्या अभिलेखांतील एकूण ४१ लाख ४९ हजार ९४८ नोंदींची तपासणी , आत्तापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठाच्या आढळल्या १२१५ नोंदी
उस्मानाबाद - धाराशिव,दि.10 ): 7 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित समितीने व छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या अभिलेखांतील एकूण 41 लाख 49 हजार 948 नोंदींची तपासणी करण्यात आली आहे.या अभिलेख तपासणीमध्ये जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 1215 कुणबी, मराठा-कुणबी, कुणबीमराठा नोंदी आढळून आल्या आहेत.
त्याबाबतचा तालुकानिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे.धाराशिव – 539, तुळजापूर – 320, उमरगा – 58, लोहारा – 1, भूम – 57, कळंब – 141, परंडा – 78 व वाशी तालका – 21 याप्रमाणे कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत.
अभिलेखांच्या तपासणीमध्ये ज्या गावांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी आढळून आलेल्या आहेत. त्या नोंदीतील व्यक्तीचे, गावाचे नावाची यादी व आढळून आलेल्या अभिलेखाची स्कॅन केलेली प्रत, मोडी/उर्दू लिपीतील अभिलेखांची प्रमाणित भाषांतरित प्रत आदी माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त करुन घेऊन धाराशिव जिल्ह्याचे संकतेस्थळावर (https://osmanabad.gov.in/
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी धाराशिव जिल्ह्याचे संकतेस्थळावर (https://osmanabad.gov.in/
तसेच पात्र असलेल्या व्यक्तींनी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन विहित पद्धतीने महा-ई-सेवा केंद्रामार्फत Online अर्ज भरावेत.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.