सोलापूर (दि.6)
सोलापूर शहरातील जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर रतनचंद माणिकचंद करकमकर यांचे आज दि 6 नोव्हेंबर सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूरचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. सोलापुरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राशी त्यांचा अनेक वर्ष संबंध होता. येथील बाजीराव चौक येथे त्यांचं गेली अनेक वर्ष क्लिनिक होतं. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच, मुलगा डॉक्टर सुहास करकमकर मुलगी जाई सांगवी, सून नातवंड असा परिवार आहे.
होमगार्ड मैदान रेल्वे लाईन्स येथील निवासस्थानी त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला होता. डॉक्टर रतनचंद करकमकर यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मोदी विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.